माडग्याळ / विजय चौगुले.
महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आले आहे.२७ मार्चला पोटनिवडणूक होणार आहे.
जत विधानसभा निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर विजयी झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे या जागी वरती जत तालुक्यातील लिंगायत समाजाचे भाजपचे जेष्ठ नेते भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष, सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे केंद्रीय संचालक, जत विधानसभा समन्वयक डॉक्टर रवींद्र आरळी यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी भाजपा वैद्यकीय सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सार्थक हिट्टी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, मोठा जनसंपर्क आणि पक्षवाढीसाठी तळमळीने काम करण्याची जिद्द यामुळे डॉ. आरळी यांनी मोठा जनसंपर्क तयार केला आहे.
जत विधानसभा निवडणुकीत आ. गोपीचंद पडळकर यांच्या विजयात मोलाची कामगिरी त्यांनी केली आहे .
डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या उमेदवारीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शिफारस करावी व डॉक्टर आरळी यांच्या उमेदवारीसाठी पाठबळ द्यावे अशीही मागणी डॉक्टर हिट्टी यांनी केली आहे .
चौकट .
एक मत दोन आमदार ची वचन पूर्ती करावी

जत विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपाने १ मत दिले तर जतला २ आमदार मिळतील असा प्रचार केला होता . विधानसभेत लोकनियुक्त आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी गोपीचंद पडळकर हे विधानपरिषद आमदार होते आता ते जत मधून विजयी झाल्याने विधान परिषदेची एक जागा रिक्त झाली आहे सदर जागेवर डॉ रवींद्र आरळी यांना उमेदवारी देऊन वचन पूर्ती करावी
- डॉक्टर सार्थकदादा हिट्टी.