पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली दिव्यांगांना प्रमाणपत्र देणेसंबंधी रूग्णालयातील संबंधीत विभागाकडून दिव्यांगाची हेळसांड .माडग्याळ / वार्ताहरपद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली या ठिकाणी जिल्हातील अनेक दिव्यांग बांधव प्रमाणपत्र येत असतात. पंरतु या हॉस्पिटलमधाल असणारे विभागामध्ये कार्यरत कर्मचारी श्री. लतेश बनकर, क. लिपीक, मानसिंग भोसले दंत तज्ञ यांचेकडून दिव्यांगाचो मोठ्या प्रमाणात हेळसांड केली जाते . दिव्यांगाना अपमानस्प्द वागणूक दिली जाते. प्रमाणपत्र देणेबाबत दिरंगाई केली जाते .जाणीवपूर्वक प्रमाणपत्र देण्यास विलंब केला जातो, दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळणेकामी कमीत कमी १ वर्षाचा कालावधी लागतो. तसेच दिव्यांगा सोबत नातेवाईक आले असता त्यांना अरेरावीची भाषा करून, शिवीगाळ केली जात असते. तसेच कामकाज वेळेमध्ये सदरच्या विभागातील कर्मचारी हे कार्यालयात दिसून येत नाही. मागील ३ महिन्या पासून दिव्यांग प्रमाण पत्र विभाग बंद असल्यामुळे दिव्यांग लोकांचे हाल होत आहेत, तसेच शैक्षणिक कामासाठी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. इतर जिल्ह्यात प्रमाणपत्र देण्याचे काम सुरळीत सुरु आहे पण सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये वेबसाईट बंद आहे असे सांगितले जात आहे .त्यामुळे या मनमानी काम करणा-या कर्मचा-याकडून दिव्यांगाना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास दिला जातो. त्यामुळे सदर विभागत कार्यरत कर्मचा-यां विषयी जिल्हयातील दिव्यांगामध्ये तीव्र प्रकारचा असंतोष असून याबाबत आपण वरील कर्मचा-यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी. तसेच कार्यालयीन कामासाठी आलेल्या दिव्यांगाना सन्मानाची वागणक दयावी . सांगली जिल्हयातील दिव्यांग बांधवांना घेऊन शिवस्वराज युवा संघटनेमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणेत येईल.